Header Ads Widget

बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्यासह नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची दमदार कामगिरी - जुगार खेळणाऱ्यावर मारला छापा ८ आरोपीसह ५ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -


माधव पवार / मधुकर जवळे :- 

नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वामन नगरच्या बाजूला शेतात पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती गोपीनाथ माहिती दारा कडून मिळाल्यामुळे बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्याचे पथक तात्काळ तयार करण्यात आले व आणि कसल्याच प्रकारचा विलंब न करता जुगार खेळत असलेल्या घटनास्थळी रात्रीला पायी चालत जाऊन जुगाऱ्यावर दमदार छापा मारला या छाप्या दरम्यान काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले तर तर काही जुगाऱ्याना नायगाव पोलीसानी ताब्यात घेतले असल्याची पोनि अभिषेक शिंदे यांनी दिली आहें
आयपीएस अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी छापा  यशस्वी करण्यासाठी ठाण्याचे फौजदार बाचावार, वाघमारे, मुस्तापुरे, देगलूरकर, वळणे, गंदपवाड, तमलुरे, देवकते, क्षीरसागर, व आयपीएस चांडक यांचे चालक झेलेवाड, अंगरक्षक आचेवाड असे पथक पोनि शिंदे यांनी तयार करून सदरचा छापा मरण्यार आला या छाप्यातील तीन आरोपी पत्ते जुगार पैसे लावून खेळत असताना मिळून आले यांच्या कडून नगदी रक्कम ५ लाख २४ हाजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी सांगितले आहें
सदरच्या छापेमारी प्रकरणातील आरोपी कडून एकूण ६ मोबाईल व ७ मोटार सायकली असे आरोपीसह पोलिसांनी ताब्यात घेतले यातील आरोपी शेख जावैद सरदार राहणार विठ्ठल नगर नायगाव, शिवाजी नागोराव जाधव कृष्णूर तालुका नायगाव, बालाजी तुळशीराम गुडमलवार राहणार मुखेड, शिवाजी बाबाराव पाटील मुखेड, पिराजी बालाजी काळमिरे राहणार सालेगाव तालुका नायगाव,सोमनाथ रावसाहेब बैलके नायगाव, हंनमत गोविंद बोईनवाड बेळगे नगर नायगाव, राजेश शिवाजी सुकने राहणार जुने नायगाव, या सदरच्या प्रकरणात एकूण ८ आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर बाकी अंधाराचा फायदा घेवून पळून गेले आहेत

सदरील आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४ / २०२२ कलम १२ ( अ ) मुबंई जुगार कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्तापुरे हे करीत आहेत 





Post a Comment

0 Comments