नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी येतो तरी सदरचा निधी विकासाविना जातो तरी कुठे ? असा प्रश्न केला जात असला तरी या मतदार संघातील रस्त्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर असताना सुद्धा सदरचे अधिकारी रस्ते दुरुस्त करण्यासाठी चाल ढकल पणा करीत असतात परंतु जनता मात्र राजकीय पुढाऱ्याच्या नावाने डोक्यावर खापरे फोडीत असल्याचे चर्चा असली तरी या विभातुन निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज आहे
राजकीय पुढारी केवळ निवडणुका कोणत्या ही असो लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या असो या निवडणुकी समोर मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठी अनेका रस्त्याचे व विकास कामाचे नारळ फोडून उदघाटन करीत असतात नायगाव विधानसभा मतदार संघासाठी आलेला ५० कोठी रुपयाचा निधीचा विकास कधी होणार या कडे जनतेचे लक्ष लागले असले तरी घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी १३ कोठी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले तर मग सदरचा आलेला निधी विकाविना गेला कुणीकडे असा प्रश्न केला जात आहे
नायगावच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा बेजबाबदार पणामुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची विल्हेवाट लागली असल्याचे दिसून येते याच विभागाच्या मार्फत करण्यात येत असलेले पुले नकोत्या ठिकाणी केले जात असून ज्या ठिकाणी धोकादायक पूल आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव यांनी कामे मंजूर करून केले जात नाहीत
रुई बु येथील ओढ्यातील पूल गेल्या अनेका वर्षा पासून प्रतीक्षेत असताना सुद्धा ह्या पुलाचे बांधकाम अथवा उंची वाढावीली जात नाही पावसाळ्यात अनेका बळेगाव, उमरी इज्जतगाव, घुंगराळा, रुई बु असा पुरामुळे संपर्क तूटत असते तरी राजकीय पुढाकाऱ्यासह अधिकारी लक्ष देण्यासाठी तयार नसल्याचे ही जनतेतुन बोलल्या जात आहें

0 Comments