माधव पवार
उमरी तालुक्यातील मौजे सिंदी येथे दिनांक १ ऑक्टॉवर २०२२ रोजी दिवसा ढवळ्या बँकेत दरोडेखोरानी प्रवेश करून रक्कम लुटण्यासाठी तलवाऱ्याचा धाक दाखवीत दुपाऱी २ वाजण्याच्या सुमारास कवळे गुरुजी यांची बँक लुटली या दरम्यान बँकेत दहशत निर्माण करून सदरची रक्कम पळवित असताना बँकेतील धाडसी कर्मचाऱ्यानी दरोडेखोर पळून जात असताना दगडाचा अथवा वीटकरीचा वापर करून दरोडेखोराच्या दिशेने फेकल्यामुळे सदरच्या दरोडेखोराला लागून तो खाली पडला होताबँक लुटून पळ काढणाऱ्या दरोडेखोराला लोकांनी जीव मुठीत धरून एका दरोडेखोराना चांगलाच चोप देऊन उमरी पोलिसाच्या स्वाधिन केले असल्यामुळे तो एक दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सदरील बँक दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सक्षम पोलीसाचे पथक जारी करण्यात आले आहें
उमरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सिंदी येथील व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थाच्या शाखेत दरोडेखोरानी भर दिवसा ढवळ्या दरोडा टाकल्या प्रकारणी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह एल सी बीच्या पोलीस अधिकाऱ्यानी सिंदी येथे घटनास्थळी भेट दिली आहें

0 Comments