नायगाव फास्ट न्यूज - नेटवर्क --
नागपूर : आम्ही हिंदुत्वावर कायम असून हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही ज्यांना भीती वाटते त्या अल्पसंख्याक लोकांसोबत आम्ही संवाद साधत असतो हे अनेक दिवसांपासून सुरू आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहें
तसेच परिस्थिती नुसार राष्ट्र विरोधी लोक वागतात हे भोळे बनून येतात मात्र आपण त्यांच्या पासून सावधान राहिलं पाहिजे असा सल्ला भागवत यांनी स्वंयसेवकांना दिला आहे विजया दशमीला दर वर्षी साजरा होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिनाला संघ परिवारात अनन्य साधारण महत्त्व असून सन १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली आहे
त्यानंतर दरवर्षी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ त्यांचा स्थापना दिवस साजरा करतो. हा स्थापना दिवस अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो या कार्यक्रमात दरवर्षी एक प्रमुख अतिथी बोलवले जातात या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला संतोष यादव यांना बोलवण्यात आल यावेळी मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं आहे

0 Comments