वांद्रे पोलीस ठाण्याच्या हदीतुन गुढग्यापासून पाय नसलेल्या आशिक नावाच्या आरोपीने २ वर्षाच्या मुलीला पळविले आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन
माधव पवार
नायागांव फास्ट न्यूज नेटवर्क - वांद्रे -
वांद्रे पोलीस ठाण्याच्या हदीतुन गुढग्यापासून पाय नसलेल्या आशिक नावाच्या आरोपीने २ वर्षाच्या मुलीला पळविले आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६२० / २०२२ कलम ३६३ (अ) ३६३ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात असून सदरील गुन्ह्यातील सदरचा आरोपी हा वांद्रे पोलिसांना पाहिजे आहें
सदरच्या आरोपीचे नाव आशिक वय अंदाजे ३० वर्षे हा आयत नावाच्या २ वर्षे वयाच्या मुलीला दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ साडे पाचच्या दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून घेऊन गेला आहें
सदरचा आरोपी हा दोन्ही पायाने अपंग असून त्याचे दोन्ही पाय गुढघ्या पासून नाहीत तरी ही तो गुढघ्यावर चालतो तो गर्द पितो तसेच भीक मागून उदरनिर्वाह करतो सदरचा आरोपी हा मंदिर, मस्जिद, दर्गा, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी येण्याची शक्यता आहे
पोलीस ठाणेच्या प्रत्येक अधिकारी अमलदारानी आरोपी अथवा मुली बाबत काही ही माहिती उपलब्ध झाल्यास वांद्रे पोलीस ठाणेस संपर्क करावा स.पो.नि. विजय आचरेकर मो -९८७०१५६२२१ स.पो.नि. बजरंग जगताप मो - ९८९२२३१२२९ स.फौ.रमेशपेडणेकर ९७६७८४०४९० पो.ह.मदन मोरे ९७६८५२४५०८ या नंबर संपर्क करावे असे वांद्रे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानी केले आहे

0 Comments