Header Ads Widget

आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे सपोनि महादेव पुरी यांची दमदार कामगिरी १२ लाख ७१ हजार ४९० रुपयाचा गुटखा जप्त आरोपी पोलिसांच्या ताब्यात !!


      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळा बु येथे बिलोलीचे कर्तव्यदक्ष आयपीएस अर्चित चांडक यांना काहाळा येथे गुटखा मोठया प्रमाणात साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार नायगाव व कुंटूर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने एक पथक नेमवून काहाळा बु येथील गुटखा किंग मुस्तफा जमील शेख वय २४ वर्ष राहणार काहाळा यांनी त्यांच्या नवी अबादी येथील टीना पत्राच्या रूम मध्ये अवैध रित्या गुटखा विक्री करण्यासाठी साठवून ठेवला होता
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशानुसार नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी गुटख्यावर छापा मारून १२ लाख ७१ हाजार ४९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 
बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्या आदेशानुसार नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी,रामतीर्थ पोलीस ठाण्याचे फौजदार लथीफ शेख, बरबडा बिटचे जेमादार आर के निखते, सोनकांबळे, मुस्तापुरे, चरकूलवार,इंगोले, पठाण, शिंदे असे पोलीस पथक तयार करण्यात आले होते या दमदार पथकाने काहाळा बु येथील गुटखा किंग आरोपी मुस्ताफा जमील शेख यांच्यासह गुटखा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे
महाराष्ट्र शासन प्रतिबंधक केलेल्या गुटखा सुगंधित तंबाखू असा एकूण १२ लाख ७१ हाजार ४९० रुपयाचा मुद्देमाल  पोलीसानी जप्त करीत सदरच्या आरोपीला ताब्यात घेऊन कुंटूर पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा १६७ / २०२२ कलम १८८,२७२,२७३,३२८, भादवि, सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६( २) २७,३०, ( २ ) ( अ ) चा भंग करून शिक्षा पात्र कलम ५९ अन्वे गुन्हा आरोपीच्या विरोधात दाखल करून कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी हे पुढील तपास करीत आहेत 

Post a Comment

0 Comments