Header Ads Widget

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी मांजरम येथे साजरी !!


विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 

मांजरम येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी येथील हनुमान मंदिरात साजरी करण्यात आली ‌.मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा लेखाजोखा या निमित्ताने मांडण्यात आला आहे 
मांजरम येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यक्रमाधिकारी साहेबराव आबाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली यावेळी राष्ट्रसंताच्या राष्ट्रभक्तीच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे 

महाराजांनी लिहिलेली गीते हे समाजासाठी आरसा आहेत, ग्रामगीतेतून केलेला उपदेश जीवन जगण्यासाठी बळ देते असे हे महान राष्ट्रसंत तुम्हाला सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. असे विचार मांडण्यात आले आहे 
यावेळी भजन मालिका सादर करण्यात आली यात विनायक पाटील, अनंतराव मंगनाळे,बालाजी माली पाटील, विकास भुरे,  शिवाजी शिंदे, बाबुराव शिंदे, भानुदास शिंदे, दत्तात्रय गायकवाड,शुभम माली पाटील,नागेश मंगनाळे, बालाजी शिंदे, जयराज शिंदे , राजेश वाकर्डे, ओमकार माली पाटील, हणमंत गायकवाड, प्रकाश शिंदे , देवराव केते, आदी गुरुदेव सेवा  मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे 

Post a Comment

0 Comments