माधव पवार
नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या व नायगाव जवळ येतील भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून दुचाकी वाहन धारकांना अतिशय सुंदर सवलत देण्यात आली आहे दोनशे रुपयांच्या पेट्रोलवर ३०० रुपयेचे पेट्रोल फ्री देण्याची मोहीम राबविली असल्यामुळे ग्राहक जवळ पास दोनशे रुपयांच्यावर भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर टाकत असल्यामुळे एका बाजूने धंदा होताना दिसत आहे
पेट्रोल पंप धारका कडून दुसऱ्या बाजूने तीनशे रुपयाचे फ्री पेट्रोल देत व मिळत असल्याने एकीकडे ग्राहक खूष दुसरीकडे पेट्रोल पंप मालक समाधान या सदरच्या मोहिमेतून दिसून येत आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातून मोटर सायकल स्वार यानी भारत पेट्रोलियम पंपावर दोनशे रुपयांच्या पेट्रोलवर तीनशे रुपयाचे पेट्रोल फ्री मिळत असल्यामुळे अनेक मोटर सायकलवाले दोनशे रुपयाचे पेट्रोल टाकत असून त्या ग्राहकाचे नाव पत्ता मोबाईल अशा पद्धतीचे पेट्रोल पंप धारका कडून लिहून घेत आहेत
जर या मोहिमेत त्या ग्रहकाचा नंबर लागल्यास त्यांना फोन करून बोलावून घेतले जाणार असून आणि त्याच ठिकाणी त्यांना तीनशे रुपयाचे फ्री पेट्रोल टाकण्यात येणार असल्याचे सदरच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल टाकणारे कर्मचारी ग्राहकांना पटवून सांगत असल्याचे ही पाहवयास ऐकावयास मिळत आहे

0 Comments