Header Ads Widget

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम ए टी एम मधून निघत नसल्यामुळे शेतकरी हैराण -

      माधव पवार
जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम ए टी एम मधून निघत नसल्यामुळे शेतकरी हैराण असले तरी सदरची रक्कम निघत नसल्यामुळे सदरच्या बँकेची बदनामी होण्याच्या मार्गांवर आहे
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सदरचे अनुदान बँकेत जमा केले परंतु इतर बँकेतुन शेतकऱ्यांच्या ए टी एम द्वारे पैसे निघत आहेत परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली ते काढण्यासाठी शेतकरी  शेतातील काम धंदे सोडून पैसे काढण्यासाठी जात आहे

शेतकरी पर्याय व्यवस्था असलेल्या ठिकाणी म्हणजे ए टी एम जवळ जाऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकरी पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहेत
तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहेत शेतकऱ्यांनी फार मोठा बँकेवर विश्वास ठेवला असल्यामुळे सदरच्या बँकेतून अनुदान असो विमा असो अथवा कर्ज वाटप असो तात्काळ देण्यात येते आहे

सदरची बदनामी टाळण्यासाठी बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे 

शासनाच्या बेजबाबदार पणामुळे या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी ए टी एम मधून रक्कम काढण्यासाठी टाईम टेबल लावला सकाळी आठ वाजता दुपारी बारा वाजता सायंकाळी चार वाजता तरी बँकेच्या एटीएम रक्कम निघत नसल्यामुळे शेतकरी चांगला वैतागून गेला आहे 


Post a Comment

0 Comments