Header Ads Widget

भोकर ते उमरी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपा जवळ पिकअपची ऑटो धडक तीन विध्यार्थ्यासह सहाजण जखमी ? -


 नायगाव फास्ट न्यूज - नायगाव - 

भोकर ते उमरी रोड जवळ असलेल्या पेट्रोल पंम्पावर  डिझेल टाकण्यासाठी जाणाऱ्या शाळेच्या विध्यार्थ्याच्या अँटोला भोकर येथून उमरी कडे जाणाऱ्या बोलेरो पिक अपने ऑटोला धडक दिल्यामुळे ऑटो पल्टी खाऊन यातील तीन विध्यार्थ्यासह चालक यांच्या बरोबर सहा जण जखमी झाले असुन डोक्याला हाताला पायाला दुखापत झाल्याचे समजते सदरची घटना दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान उमरी ते भोकर चौरस्ता मामा चौक येथे घडली आहे   

उमरी येथून शालेय  विध्यार्थ्याना घेऊन अटोत   डिझेल टाकण्यासाठी जाणाऱ्या अटोला भोकरहून  भरधाव वेगाने येणाऱ्या  पिक  अप  क्रमांक एम एच २६  बी. ई.७७५० या गाडीने धडक दिल्याने अटो पल्टी खाल्याने त्यात बसलेले  विध्यार्थ्यी रितेश सुरेश जाधव वय १७ इयत्ता दाहावी, तेजस्विनी भिकाजी जाधव वय ११ वर्षे  इयत्ता पाचवी ,बलविंदर राजु राठोड वय १२ वर्षे इयत्ता सहावी हे तीन विध्यार्थ्यी नुतन विघालय उमरी येथे  शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येते 

सदरच्या अपघात सुनील  सुरेश भालेराव वय २२ वर्षे ड्रायव्हर ,शेवंताबाई नानु राठोड वय ५० वर्षे, उतम रामधन चव्हाण वय ४२ वर्षे हे सहाजण  दुर्गानगर तांडा तालुका उमरी येथील असुन  पिक अप गाडीने धडक दिल्याने अटो पल्टी होऊन सहा जणांना हाताला ,पायला डोक्याला मार लागले असुन त्यांना उपचारासाठी उमरी येथील  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता  वैधकिय आधिकारी डॉ मारोती चंदापुरे यांनी   उपचार केला असुन  रात्री उशिरा उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती आदीच माहिती प्राप्त होऊ शकली नसली मिळण्याची शक्यता आहे 

Post a Comment

0 Comments