माधव पवार
नांदेड कडून देगलूर बिलोली मुखेड नायगाव नरसी कडे सकाळी जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सहा ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सकाळी घुंगराळा येथील बस स्टँड वर थांबत नसल्यामुळे नायगाव येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येत असून सदरच्या बसेसचा थांब असताना सुद्धा विद्यार्थीना वाहक व चालक उभे करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी वेळ होत असल्याचे विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बोलल्या जात आहे
राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याचा बेदखल कारभार झाल्यामुळे व तसेच वाहकावर चालकांवर त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे बस चालकांचा मनमनी वाढला असल्यामुळे सदरच्या बाबीकडे वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज असून सदरच्या बसेस घुंगराळा येथे उभे करत नसल्याने विद्यार्थी पास काढून सुद्धा त्यांचा काहीच उपयोग होत नाही त्यांच्या शिक्षणाचा चांगलाच खेळखंडोबा होताना दिसून येत आहे
बसेस कशामुळे थांबत नाहीत असे ही जनतेतून
बोलल्या जात असून सदरच्या अधिकाऱ्यानी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन घुंगराळा येथे दररोज सकाळी सहा ते नऊ वाजण्याच्या दरम्यानच्या बसेच थांबून विद्यार्थ्यांना नायगाव येथे घेऊन जाण्यासाठी बसेसची सोय करावी सदरच्या चालकाला वाहकला सूचना दयावे अथवा आदेश दयावेत मागणी होत आहे

0 Comments