Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनानेचे अनुदान तात्काळ उचलण्यासाठी आपले ज्या बँकेत खाते आहेत त्या बँकेचे खाते नंबर तलाठ्याना दयावे तहसीलदार गायकवाड यांचे आवाहन


 हिमायतनगर नागोराव शिंदे : 

हिमायतनगर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी शासनाचे अनुदान तात्काळ उचलण्यासाठी आपले ज्या बँकेत खाते आहेत त्या बँकेचे खाते नंबर आपल्या कडे देऊन सहकार्य करावे असे हिमायतनगरचे तहसीलदार गायकवाड यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी आवाहन केले आहे 

असून या संदर्भात नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी यांनी थेट तहसीलदार यांच्याशी थेट भेटून सदरची माहिती घेतली आणि तहसीलदारानी अतिवृष्टीने व नदी नाल्याच्या पुराने खरडून गेलेल्या जमिनीच्या पिकांचा शेतकऱ्यांना मोबदला म्हणून शासनाने मंजूर केलेल्या रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे
बँक निहाय शेतकऱ्यांचे बचत  खाते ज्या बँकेमध्ये आहेत त्या बँकेमध्ये येणारे शासनाचे अनुदान जमा करा कारण नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक शाखा असून या शाखेला ६५ गाव जोडलेले आहेत
----------------------------------------------------------------
हिमायतनगरचे तहसीलदार म्हणतात तलाठ्याना सूचना    दिल्यात - शेतकरी म्हणतात सूचना नको आदेश द्या - साहेब -
---------------------------------------------------------------
तहसीलदार डी एन गायकवाड यांनी तलाठी यांना फोन वरून सूचना दिल्या की ज्या शेतकरी बांधवांचे भारतीय स्टेट बँकेचे व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाते क्रमांक येणाऱ्या अनुदान यादीवर टाकून शेतकऱ्यांना कसे तात्काळ अनुदान मिळतील यावर लक्ष केंद्रित करा असे गायकवाड यांनी फोन वरून सांगितले होते

शासनाचे मंजूर झालेले अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सहा महिन्याचा कालावधी लागत असल्याने या बाबीकडे जिल्हाधिकारी लक्ष देऊन शेतकऱ्यांचे ज्या बँकेमध्ये खाते आहेत त्या बचत खात्यामध्ये शेतकऱ्यांना थेट अनुदान जमा करून शेतकऱ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून दयावेत अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे




 

 

Post a Comment

0 Comments