बरबडा :- किरण हणमंते
बरबडा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपसरपंच सौ. छायाताई धर्माधिकारी, ग्रामपंचायत सदस्य बालाजीराव धर्माधिकारी, बालाजी घोसलवाड, गौतम हनमंते, बाबु इंद्रवाड, पांडुरंग एडके,
पोलिस हेड कॉन्स्टेबल रमेश निखाते, जमादार लक्ष्मण सोनकांबळे, पोलिस नाईक मोहन कंधारे, पोलिस पाटिल प्रतिनिधी संजय कानगुले, माधव माचनवाड, पोतन्ना जंगीलवाड, प्रकाशराव धर्माधिकारी यांच्या सहित अंगणवाडी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू मा. व उच्च मा. विद्यालयात उपमुख्यध्यापक गणेश बडूरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हा परिषद व कन्या शाळा यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. याठिकाणी मुख्याध्यापक साहेब गुंटे व कंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी शिक्षक शिक्षिका आणि विध्यार्थी उपस्थित होत्र.

0 Comments