बरबडा :- किरण हणमंते :-
बरबडा येथे जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या यांच्या स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कै.दिगंबररावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या एकवीस व्या पुण्यस्मरणा निमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अठरा सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ठिक अकरा वाजता कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले.
तत्पूर्वी सावित्रीबाई फुले व कै दिगंबररावजी धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सुरवातीला आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. सोळंके, प्रा. तगडपल्लेवार आणि एन. टी. तिप्पलवाड या सर्वांनी कै. दिगंबरराव धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव करत आपल्याला कशा पद्धतीने सहवास लाभला असे सांगितले. त्यांनी राजकारण आणि समाजकारण करताना कशा रितीने करून माणसाला आपलस करून घेतले व नवरात्रीला अनेक कार्यक्रम घेऊन समाज कार्याला हातभार लावल्याचे सांगण्यात आले.
जेष्ठ साहित्यिक नारायण शिंदे आणि प्रसिद्ध कविकार प्रा. मनोज बोरगावकर यांनी आपल्या विशेष शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अभ्यासाविषयीं करून कै. दिगंबरराव धर्माधिकारी यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. या धर्माधिकारी परिवाराचे मोठे योगदान असल्याचे सांगण्यात आले. त्यांना विविध ठिकाणी मनाचे स्थान आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कार्याचा पाढा विध्यार्थ्या पुढे सांगण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बडूरे, तर सुत्रसंचालन प्रा. शिवाजी हंबर्डे आणि आभार संतोष पचलिंग यांनी केले.

0 Comments