Header Ads Widget

शेतकऱ्यांना व घरगुती मीटर धारकांना सुरळीत लाईट पुरवटा करायचं असेल तर अधिकार्‍यासह कर्मचाऱ्यांचे रिक्त भरा - अन्यथा वसुली बंद करा -


    
   
          
         माधव पवार
शहरी भागासह ग्रामीण भागात विद्युत वितरण कंपनीचा गेल्या आठवड्यापासून अजब कारभार वाढला असल्यामुळे दिवसातून वीस ते २५ बार रात्रीला दहा-बार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती मीटर धारक चांगलेच वैतागले  आहे

ग्रामीण भागातील सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याची मोठ्या प्रमाणात कमतरता पडत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरच्या तात्काळ जागा भरून विद्युत वितरणची सुविधा शेतकऱ्यासह मीटर धारकाला द्यावेत अशी मागणी होत आहे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जिल्हा अधीक्षक यांनी विद्युत वितरण कंपनी उपविभाग नायगावच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कृष्णूर, नरसी, मांजरम या ठिकाणी साहाय्यक अभियंत्याच्या व दहा ते बारा कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे कोणते ही कामे सुरळीत होत नसल्याने शेतकरी चांगलाच वैतागला एकीकडे वीज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा नेहमीसाठी खंडित होत असताना सुद्धा वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी अधिकारी वेठीस धरल्या जात आहे
विद्युत पुरवठा सुरळीत नसताना सुद्धा शेतकऱ्यांसह घरगुती मीटर धारकाला भरावे लागत असताना सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही कारण ना दुरुस्त असलेले कामे वसुलीमुळे होत नाहीत विलाजाने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना संपूर्ण कामे बाजूला ठेवून वसुली करावी लागत असल्याचे दिसून येत असले तरी अधिकाऱ्याला ही शेतकरी बोलत आहेत पहिले लाईट द्या नंतर बीज वसुली करा असे सांगताना ऐकावयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments