Header Ads Widget

कहाळा येथे थांबा व्यवस्थित नसल्याने प्रवाश्याची गैरसोय

 बरबडा :- किरण हणमंते - 

नांदेड ते हैद्राबाद रोडवर कहाळा (खु) हे मेन हायवे असल्यामुळे येथून प्रवासी अनेक गावाला जावे लागते परंतु मुख्य ठिकाणी बस थांबा शेड न बांधता शासनाने दुसऱ्याच जागी शेड बांधल्यामुळे प्रवाशांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. लहान मुल महिलांना शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शासनाने महामंडळ याचा थांबा योग्य ठिकाणी नाही तरी हि महामंडळ ची बस ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी रोडच्या काठेवर व्यवस्थित रित्या मुरूम टाकला नसून ते उंच खाली असल्यामुळे प्रवाशी खाली पडत आहेत
वयोवृद्ध असणाऱ्यांना तर धड खाली पण उतरता येत नाही त्यामुळे प्रवाश्यातुन नाराजी व्यक्त होत आहे.रोड लेवल पिचिंग झाली नसल्याने हि गैरसोय तर होतच आहे
बस स्टॅण्ड जवळ बस थांबली तेव्हा प्रवाशी यांना चढ  उत्तार करण्यास कसरत करावी लागते.पण थांबा पण नसल्याने उन्हात व पावसात प्रवाशाला थांबावे लागत आहे कोणी हॉटेल यांचा तर कुणी दुकानाचा आसरा घेत आहेत. या होणाऱ्या गैरसोयिडे ग्रामपंचायत ने लक्ष घालुन शासनाकडे गैरसोय होणार नाही यासाठी उपाय योजना करून घेण्यासाठी शासना कडे पाठपुरावा करून प्रवाशाची गैरसोय थांबवावी असे जनतेतून बोलल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments