नायगाव प्रतिनिधी:- बाळासाहेब पांडे -
माणिकनगर ता.नायगाव बा. येथील हरहुन्नरीु कलावन्त तथा चित्रकला शिक्षक बालाजी पेटकर यांचा मुलगा ओमकार बालाजीराव पेटेकर याने जे.जे.वैद्यकीय महाविद्यालय मुंबई च्या वतीनेआयोजित बुद्धिबळ स्पर्धेत। आव्वल स्थान पटकावून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.त्याने गोल्डमेडल स्मृती चिन्ह व रोख रक्कम असे बक्षीस मिळविले आहे.त्याच्या यशबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यापूर्वीही ओमकार पेटेकर यांनी बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची चमक दाखवत अनेक स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश मिळवले आहे.त्याने जिल्हास्तरीय वर तीन वेळेस प्रथम आला तर विभागीय स्पर्धेत दोन वेळेस प्रथम आला होता.नुकतेच कोल्हापुर येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या कर्तुत्वाची झलक दाखवत १८० स्पर्धकातुन त्याने ५ वे स्थान प्राप्त केला होता.
त्याच्या या यशाबद्दल जे.जे.हॉस्पिटलच्या वतिने सर्व डाँ.कर्मचारी व माणिक नगर वासीय बाळासाहेब पांडे,उत्तम वडजे,प्राचार्य मारुती माने,कदम सर हिपरगेकर,गिरी सर,पांचाळ सर,दता घोडके,यादव भैरवाड, मठपती महाराज,संभाजी घोडके,शिंदे साहेब,जाधव साहेब,उदगिरे साहेब,धोंडिबा मंगनाळे, दत्तू शिंदे,वडजे सर,बेळगे आपा,चारवाडीकर सर,पटलेवाड सर,घोणशेवाड,भुरेवार,डाँ वानोळे,जाधव,मुरमुरे,पवळे नावंदीकर,उपडहुद्दे,भुरेवार यांच्या सह परीसरातुन सर्वत्र या यशाबद्दल कौतुकास्पद अभिनंदन केले आहे...

0 Comments