बरबडा :- किरण हानमंते -
बरबडा येथील कुंटूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेली पोलिस चौकी आहे. पूर्वी त्या चौकीत पोलिस कॉन्स्टेबल सतत वास्तव्यास राहत होते. ती जुनी इमारत असल्यामुळे त्याला नविन इमारत बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी दिला होता. त्यानुसार तसे बांधकाम पण पुर्ण करण्यात आले होते. उदघाटन करून त्यामध्ये प्रवेश करायचा होता परंतु कुठे घोडे अडले काय माहित आजवर उदघाटन काही झाले नाही. ना इमारत जाग्यावर ना पोलिस ना चौकी असे गावाकऱ्यातून चर्चा आहे
इमारत इतकी वर्ष तयार झाली. पण तिथे न जाणे यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. नविन इमारत जुनी होत चाली तरी उदघाटन नाही. त्यामध्ये प्रवेश नाही याचा अर्थ काय होतो असे गावकरी बोलून दाखवत आहेत. बरबडा हे मोठया वस्तीचे गाव असल्याने आजूबाजूला असणारी गावे यावर नजर ठेवता येईल यासाठी हि चौकी निर्माण केली आहे. या मध्ये आता नविन इमारत झाल्याने होणारे अवैध धंदे टाळता येतील असे वाटत होते. परंतु या इमारती ला उदघाटन करण्याचा आतापर्यंत मुहूर्त काही लागेना आणि कर्मचारी पण काही जाईनात अशी अवस्था आहे.
या बाबत विचारना केली असता आम्हाला काही माहिती नाही असे उत्तरे दिली जातात. हि इमारत फक्त शोभेची वस्तु म्हणुन तेथे उभी आहे एवढेच खरे आहे. शासनाने इतका पैसा खर्च करून त्याचा काय उपयोग अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. या इमारती साठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन त्या वास्तू ची रंगरंगोटी करून ती वापरात आणावी असे गावाकऱ्यातून म्हटल्या जात आहे.

0 Comments