नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
बहुचर्चित मेळगांव ग्रामपंचायतीचे तत्कालीन दोषी ग्रामसेवक एन.एस.यरसनवार हे त्यांच्या कार्यकाळातील अभिलेखे व दस्ताऐवज चौकशीसाठी सादर करत नसतांनाही नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांना मात्र त्यांचेवर कारवाई दूरच अद्याप चौकशीलाही मुहूर्तच सापडेनासा झालाय संगनमतातून आर्थिक लोभापोटी आपल्यावर त्यांचा जाणीवपूर्वक जातियद्वेष असल्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर त्यांच्यास्तरावरुन दिलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे
नांदेडच्या जिल्हा परिषदेसह नायगांव पंचायत समितीला मात्र अद्यापही यासाठी जणू वेळच मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच मोहन धसाडे यांच्यासह तब्बल चार ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली
अधिक माहितीनुसार, ग्रा.पं.मेळगांवचे सरपंच मोहन धसाडे यांच्या ग्रामपंचायतीच्या कोऱ्या चेकबुकवर त्याचबरोबर, त्यांच्यासह तब्बल चार ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्या रजिस्टरवर तत्कालीन ग्रामसेवक एन.एस यरसनवार यांनी स्वाक्षरी घेतल्या होत्या.अनेकदा विनंतीनंतरही त्यांना विविध सभांचे विषय व माहिती देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ चालविली होती.योजनानिहाय विकास कामे आपल्या हस्तकांकडून दर्जाहीन व कागदोपत्री पूर्ण करुन घेतांनाच रस्ते,पाणी,विज,आरोग्य, नालीसफाई,गांवची स्वच्छता आदी स्थानिक जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे दूरच कर वसुली सारख्या महत्वपूर्ण बाबींकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.आहे
विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्यास्तरावरुन राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांना तर, उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्यास्तरावरुन राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांना सदर प्रकरणात योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचा ई-मेल संदेश प्राप्त झाला असून या वरिष्ठांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली
अशा प्रकारे कार्यपद्धती अवलंबित गट विकास अधिकारी निश्चितच या प्रकरणात स्वतःचे आर्थिक हित साधून जातियद्वेषातून आपल्या विरोधात कटकारस्थान करित असून त्यासाठी त्यांना येथील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शेख लतिफ यांचीही नित्याप्रमाणेच साथ असल्याने संबधित दोषीं तत्कालीन ग्रामसेवक यरसनवार व त्यांची पाठराखण करणार्या या संबधित दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी वा यासाठी आपल्या वरिष्ठांसह मा.सक्षम न्यायालयात दाद मागण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि.६ सप्टेंबरपासून पासून जि.प.नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे सरपंच मोहन धसाडे व गंगाधर कंदरवाड,माधव शिंदे, सौ.भारतबाई महिपाळे या ग्रामपंचायत सदस्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव,जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी व संबधित वरिष्ठांना तक्रार देत कारवाईचे साकडे घालीत कळविले

0 Comments