बरबडा :- किरण हनमंते
बरबडा येथील जवाहरलाल नेहरू मा व उच्च मा विद्यालया चे माजी विद्यार्थी महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ मध्ये निवड झालेल्या व एम बी बी एस साठी पात्र झालेल्या माजी विद्यार्थी नीट परीक्षेत ५९३ गुण घेऊन एम बी बी एस साठी पात्र झालेला माजी विध्यार्थी गणेश साहेबराव शेट्टे आणि महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ यामध्ये निवड झालेले विध्यार्थी आहेत
बरबडा येथील सौरभ आनेमवाड, राजेश्वर पोतनवार, गोपाळ कोंपलवाड, नागेश वटपलवाड, संदीप मदेवाड, पाटोदा येथील प्रदीप शिंदे, सुनिल तिजारे, आंतरगाव येथील शंकर तोडे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक जी पी बडूरे ,पर्यवेक्षक सुर्यकांत फड ,ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक शिंदे, प्रा.सुदर्शन धर्माधिकारी, प्रा.हंबर्डे ,एन टी तिप्पलवाड, अशोक बकेवाड यांच्या सहित, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडी बद्दल सर्व स्तरावरून त्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. एकाच वेळी महाराष्ट्र सुरक्षा बल या निवड होण्याची पहिलीच वेळ आहे. त्या सर्व विध्यार्थ्यांच्या मेहनतीला व परिश्रमाला फळ मिळाल्याचे समाधान त्यातून व्यक्त होत आहे.

0 Comments