Header Ads Widget

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही दिवसात पीक विमा व अनुदान पडण्याची शक्यता ! शेतकऱ्यांची अडचण दूर होणार का ? -


       माधव पवार 

गेल्या जुलै महिन्याच्या ७ तारखेला पडलेल्या मुसळधार पावासामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन पाण्याखाली आणि अतोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना शासना कडून आर्थिक मिळावी म्हणून विविध संघटनेच्या माध्यमातून पीक विमा व शासकीय अनुदान मिळावे मागण्या जोर धरल्या होत्या

जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यासह संबंधित तहसीलदाराकडे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हाजार रुपये द्या म्हणून मागण्या करण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कवळे गुरुजी यांनी शासना कडे प्रथम यंदा केली आणि तशा अनेक मागण्याचे निवेदन शासना कडे देण्यात आले

उमरी तालुक्यातुन प्रथम शेतकऱ्यांना अनुदान व पीक विमा तात्काळ मिळावा म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य कवळे गुरुजी यांनी केली तर नायगाव नायगाव तालुक्यातुन गजानन शंकरराव पाटील चव्हाण,व बरबडा येथील विश्वानाथ बडुरे यांनी यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांना निवेदन मागणी केली होती

जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्याच्या मागणीला आता शासनाच्या वतीने कुठे तरी दाद मिळत असून काही दिवसातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय अनुदान व पीक विम्याची रक्कम पडणार असल्याचे सांगण्यात येते खरंच शेतकऱ्याची आर्थिक अडचण दूर होईल का असे शेतकऱ्यांना वाटत आहे 

Post a Comment

0 Comments