Header Ads Widget

शाळा टिकविण्यासाठी हजरी पट नको तर शिक्षणाच्या माध्यमातून विध्यार्थीचे सक्षमीकरण होणे आवश्यक -विध्यार्थी हा नूतन पिढीचा केंद्रबिंदू !!

      माधव पवार
सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात शिक्षणाच्या बाबतीत मोठी चढाओड झाली असल्यामुळे खाजगी शाळा असो जिल्हा परिषद शाळा असो नुसत्या शाळा टिकविण्यासाठी विध्यार्थीचे हजरी पट नको तर शाळेतील गुरुजीनी देत असलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून विध्यार्थीचे
 सक्षमीकरण होणे अत्यंत महत्वाचे असून सदरचा विध्यार्थी हा त्यांच्या जीवनातील सुंदर असा प्रकाश असल्यामुळे तो स्वतःला चेमकत दुसऱ्याला ही प्रकाश देण्याचा प्रयत्न करणार आहे

कागदाला घड्या घालून फुलपाखरू तयार करण्यापेक्षा

शाळेतील शिक्षकानी विध्यार्थीच्या तेजस्वी बुद्धीला अभ्यासातून दिली तर विध्यार्थी कॉम्प्युटर युगात वेगाने शिक्षणाच्या बाबतीत धावेल गेल्या दोन ते आडीच वर्षाखाली शिक्षणाचे वाटोळे झाले त्या शिक्षणाचा दर्जा भरून काढण्यासाठी टवटवीत विध्यार्थीना घवघवीत यश मिळण्यासाठी शिक्षणाने शाळेत दुसरी कडे वेळ घालण्या पेक्षा विध्यार्थीकडे दयावेत असे अनेक सुज्ञान नागरिकातुन प्रतिक्रिया मिळत आहे

खाजगी संस्था असो की शासकीय शाळा असो या शाळेत शिक्षण घेणारा विध्यार्थी हा नूतन पिढीचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांना शासकीय सुविधे बरोबर उच्च शिक्षण घेण्यासाठी मुळातील पाया अतिशय मजबूत करण्यासाठी शिक्षणानी जास्तीचे प्रयत्न करावेत आणि मुख्यकार्यकारी अधिकारी असो की गट शिक्षण अधिकारी असो अथवा विस्तार अधिकाऱ्यानी संबंधित शाळेला भेटी देऊन शाळेचा दर्जा तपासून पाहणे गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments