माधव पवार
राज्याच्या राजकारणात राजकीय नेते मंडळीचा पक्ष बदलीचा धंदा काय जनतेसाठी नवीन नाही परंतु दिनांक ७ ते १५ जुलै २०२२ रोजीच्या कार्यकाळात मुसळधार पावासाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या जमिनीसह शेतातील पिके पाण्याखाली गेली आता त्यातून वाचलेली पिके शेतात असले तरी पाऊस पडत नसल्यामुळे पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत राज्यातल्या ई डी सरकारने अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली तर नाहीच परंतु दोन माजी मुख्यमंत्री म्हणजे अशोकराव चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दरम्यान झालेल्या चर्चेने मात्र राज्यासह ग्रामीण धुमाकूळ माजविला आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते मंडळीचे नाट्यमय गेल्या तीन महिन्या पासून चालू असल्यामुळे सदर नाट्य काय करता थांबत असल्यामुळे शेतकरी राजा उलट संकटात सापडत असून या शेतकऱ्या कोणी लक्ष देण्यासाठी धजावत नाही केवळ सत्ता हेच वैभव अशी असल्याचे शेतकऱ्यांना बोलल्या जात असून शेतकऱ्याच्या डोळ्यात पिकाचे नुकसान झाल्यामुळे व पिके वाळून जात असल्यामुळे डोळ्यात पाणी येत असताना ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात ? जाणार असल्याच्या चर्चेने ग्रामीण भागाफ उत्त आला आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात सरकार असल्यामुळे त्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत या सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले त्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक ही रुपडा जमा केला नाही परंतु या संदर्भात टीव्ही चॅनलवाल्यानी शेतकऱ्यांच्या हितासाठी चॅनलवर महत्वाची बातमी दाखविली नाही केवळ राजकीय बातम्या दाखवित माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे मा. पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडणार का ? भाजपात जाणार ? काँग्रेसचे किती तरी आमदार कोणच्या की संपर्कात असल्याच्या बातम्याने शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे

0 Comments