Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती पूनमताई पवार यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना अकराशे रुपयाची निधी वाटप !!

     
    
       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमा निमित्त विद्यमान आमदार राजेश पवार व त्यांच्या सौभाग्यवती पूनमताई पवार यांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षाच्या भेटी घाटी देऊन त्यांच्या भाजपाच्या कार्यकर्त्याच्या मार्फत एकंदरीत गणेश मंडळांना अकराशे रुपयाची देणगी स्वखर्चातुन वाटप करण्यात येत असून ह्या विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी या संघातील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेऊन व त्यांच्या कार्यकर्त्याच्या मार्फत गणेश मंडळाना देणगी वाटप करीत आहेत
गणेश मंडळाना एकूण ११०० रुपये स्वव खर्चातून प्रत्येक गावातील प्रत्येक गणेश मंडळाना वाटप करण्यात येत असून त्याच बरोबर सामाजिक बांधिलकीचा जपत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून यातील जेष्ठ नागरिक भाजपा कार्यकर्ते व्यंकटराव पाटील सुगावे कोंडीबा पाटील शिंदे आंतरगाव यांच्यासह दत्ता पाटील ढगे, सटवाजीराव मोदलवाड, बालाजी घोसलवाड, राजीव बालाजीराव दरेगावे,यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन ही नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी करत असून या कार्यक्रमांतर्गत त्यांच्या कार्यकर्त्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सहभाग आहे 
नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्यापाड्यातील सर्व गावात मोठ्या प्रमाणात श्री गणेशाची स्थापना गणेश मंडळाच्या माध्यमातून करण्यात आली असल्यामुळे या सर्व गणपतीला एकंदरीत अकराशे रुपये देणगी स्वरूपात देण्यात येत असल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यात एक उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्व गणेश मंडळाचे अध्यक्षाची भेट घेऊन व त्यांचे कार्यकर्ते श्री गणेश मंडळाच्या कार्यकारणीला गावात स्वच्छता राबविण्याच्या संदर्भात त्याच बरोबर व्यसन मुक्ती, स्वछता अभियान अंतर्गत वृक्षारोपण असा संदेश या माध्यमातून आमदार राजेश पवार हे देत आहे


Post a Comment

0 Comments