नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
विषय शिक्षकांच्या मागणी साठी मांजरम जि.प.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी पटांगणात केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश मिळाले असून आंदोनाची दखल घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम व शिक्षणाधिकारी सविता बीरगे मॅडम यांच्या आदेशावरून गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी नायगाव प.स.चे प्रभारी गट शिक्षणाधिकारी एम. जे. कदम यांनी केंद्र प्रमुख चिकलवाड, यांना सोबत घेऊन भेट देण्यात आली
तात्काळ जि.प.हायस्कुल येथे भेट देऊन तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था म्हणून एक अतिरिक्त शिक्षक व इतर तीन इतर ठिकाणचे असे एकूण चार शिक्षकांना नियुक्त करून येथील शैक्षणिक अडचणींचा तिढा सोडवला आहे.कदम यांनी या प्रकरणी दखल घेऊन हा प्रश्न सोडवल्या बदल विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी प्रशासन विभागाचे आभार मानले आहेत
मांजरम जि.प.हायस्कुल येथे विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे* प्रचंड शोक्षणिक नुकसान होत आहे.या गंभिर विषयाकडे प्रशासन म्हणावे तसे लक्ष देत नसल्याने विषय शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावा,या मागणी साठी मांजरम येथील जि.प. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी १३ सप्टेंबर रोजी पटांगणात ठिय्या मांडला होता व सकाळी प्रतिज्ञा झाल्यावर वर्गात जाण्यास नकार दिला होता
शाळेतील रिक्त जागा तात्काळ भरा म्हणत तरुणांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण गंभीर बनले होते.विषय शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्या , अन्यथा शाळेला कुलूप घालण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी व पालकांनी यावेळी दिला होता.या नंतर दै.पुण्यनगरी व नायगाव फास्ट न्यूज सह इतर वर्तमान पत्रात बातम्या छापून आल्या मांजरम जिल्हा परिषद हायस्कूल येथे पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून चारशे सदतीस( ४३७ विद्यार्थी सध्या शाळेत शिक्षण घेत आहेत
जिल्ह्यात नामांकित असलेल्या शाळेत सध्या माध्यमिक शिक्षक एक, विषय शिक्षक चार, प्राथमिक शिक्षण एक, कनिष्ठ सहाय्यक एक, परिचर एक असे एकूण आठ पद रिक्त आहेत.मराठी विषयांचे माध्यमिक शिक्षक हे सेवा निवृत्त झाल्याने ही जागा रिक्त झाली. ती जागा भरण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्र व्यवहार केला पण उपयोग झाला नाही वर्तमान पत्रात व सोशियल मीडियाच्या बातम्या या वरून नायगावचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मो.ज.कदम यांनी १५ सप्टेंबर रोजी जेष्ठ पत्रकार व शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे,घुमलवाड यांना सोबत घेऊन जि.प.हायस्कुल येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण दूर करण्या साठी पर्यायी व्यवस्था करण्या साठी भेट दिली.
शिक्षणाधिकारी प्रा.बीरगे मॅडम याना सर्व परिस्थिती भ्रमणध्वनिवरून कळविली तेंव्हा त्यानी पुर्ण अधिकार कदम यांना देऊन आपणच मार्ग काढावा असे सुचविले.या प्रमाणे तीन शिक्षक यांना आदेशीत करून त्या ठिकाणी पाठवले असून शैक्षणिक अडचण दूर करण्या साठी आजून जी व्यवस्था लागेल ते देण्याचे कदम यांनी सर्वाना आश्वासित केले.
कदम यांनी सदर अपुऱ्या कर्मचारी वर्गात ही शाळेची स्वचछता व विविध उपक्रमात सहभागाने भारावून जाऊन येथील मु.अ.सोनकांबळे व शिक्षकवृंद यांचे तोंड भरून कौतुक केले.त्यांनी उपक्रमशील शिक्षिका म्हणून सुमन मठपती मॅडम व सौ वर्षा कपीलेशवर नलबलवार (चालीकवार) मॅडम यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला या वेळी ठिकाणे सर,डी एन बैस,वामन शिंदे,पाटील सर,सय्यद सर,पांचाळ मॅडम,शिरसाठ मॅडम ,स्वामी मॅडम,बकवाड सर,सेविका शेख,व जि.प.हायस्कुल येथील कर्मचारी सह आदी उपस्थितीत होते.

0 Comments