नायगाव विशेष प्रतिनिधी बाळासाहेब पांडे -
यशवंतराव ग्रामविकास मंडळ,करकाळा यांच्या वतीने येथे नियोजित १७ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी प्रकाश भिलवंडे यांची निवड करण्यात आली आहे
नवोदित व प्रथितयश साहित्यिकांचे एकदिवसीय राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन हे करकाळा (ता. उमरी) येथील संस्थेच्या वतीने दरवर्षी भरविण्यात येते. साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य स्व. भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नरसी येथे होत असलेल्या या एकदिवसीय लोकसंवाद साहित्य संमेलनात ग्रंथदिडी, शोभायात्रा, ग्रंथ प्रकाशन, कथाकथन, कविसंमेलन व प्रकट मुलाखत अशी रूपरेषा राहणार आहे
संमेलनाच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे गठण करण्यात आले असून येथील प्रकाश भिलवंडे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. यात सर्वांनी सहभागी होऊन संमेलन सार्थकी लावावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रकाश भिलवंडे, राजेश भिलवंडे, भास्कर भिलवंडे व संयोजक दिगांबर कदम यांनी केले आहे.

0 Comments