नायगाव तालुक्यातील एकूण नव्वद ग्रामपंचायतचा कारभार केवळ ६० ग्रामसेवकावर चालत असल्यामुळे एका एका कर्मचाऱ्यांकडे तीन तीन गावे असल्याचे सांगण्यात येत असून ग्रामसेवकावर येणारा कामाचा ताण तणाव पाहता कर्मचाऱ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत असून सदरच्या कर्मचाऱ्यांकडे अनेक कामे लादल्यामुळे व ग्रामसेवक अपुरे हे कर्मचारी असल्यामुळे ना विलाजाने त्यांना कामे करावी लागत असल्याचे दिसून येत आहे
ग्रामसेवकाचे कार्य व अधिकार ग्रामसेवकाला गावाच्या विकास कामाचे नियोजन करावे लागते आणि ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करण्यासाठी व ग्रामसभेचा अहवाल तयार करण्या करिता ग्रामसभेच्या ठरावांची ग्राम सेवककाला अंमलबजावणी ही करावी लागते ग्रामसभेचे पत्र व्यवहार आणि शासकीय योजनेचे व्यवस्थापन अशी अनेक कामे व जबाबदारीने पार पाडावे लागते तरी ग्रामसेवकाना तीन तीन गावे दिले जात असल्यामुळे ग्रामसेवकावर कामाचा तणाव येताना दिसत आहे
तालुक्यातील ८९ ते ९० गावे आहेत आणि फक्त साठ ग्रामसेवक आहेत त्यातल्या त्यात एका कर्मचाऱ्यांना दोन ते तीन गावे आहेत गावचा विकास कामाचा गाडा हाकण्यासाठी ग्रामसेवक हा महत्वाचा घटक असतो परंतु शासनाकडे ग्रामसेवकाचे संख्या बळ कमी असल्यामुळे अनेक कामात अडचणी येत असल्या तरी सदरचे कर्मचारी हे वेळातला वेळ काढून गावातील नागरिकाचे कामे करत असताना दिसत आहेत

0 Comments