हिमायतनगर : नागोराव शिंदे
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती हिमायतनगर अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.जसे की गोठा फवारणी करणे, सायपरमेथ्रीन चे वाटप करणे, जनजागृती शिबिर घेण्यात येत आहेत.
आत्तापर्यंत रमनवाडी गणेशवाडी, गणेश वाडी तांडा, बोरगडी,बोरगडी तांडा,अधेगाव, डोलारी, सिल्लोडा, पळसपुर, कांडली, वाघी, दिघी, वटफळी पिंपरी,कांडली (बु), खैरगाव, मंगळूर, वडगाव, धानोरा इत्यादी गावामध्ये जनजागृती शिबिर घेण्यात आले असून इतर गावांमध्ये शिबिरे घेणे चालू आहेत.
लंपी रोगाचा शिरकाव झाला आहे अशा गावात गोट पोक्स लसीकरण होत आहे.
सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, लंपी स्कीन रोग हा योग्य वेळी उपचार घेतल्यास नक्कीच बरा होनारा रोग असून शेतकऱ्यांनी घाबरू नये. प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी आमच्या विभागासी संपर्क करून गावात दवंडी देउन शेतकरयांना सूचना कराव्यात त्या दिवशी आमचे कर्मचारी एउन लसीकरण करतील असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ उमेश सोनटक्के यांनी आमच्या प्रतिनिधीसी बोलताना सांगितले आहे.
ह्या रोगांना हद्दपार करण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून जनावरांना लक्षणं दिसताच आमच्याशी संपर्क साधावा आपल्या जनावरानाचे अंगावर गुदी,फोड किंवा लंपी रोगा सारखी लक्षणे दिसून येत असल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना श्रे -१ हिमायतनगर येथे किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन कळवावे.

0 Comments