विजय कुमार पाटील मोरे :-
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेसह आणि बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह यंत्रणेने शासनाने केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना दिल्याच्या नुसार शेतकरी केवायसी करण्यासाठी तयार असतानासुद्धा सदरील बँकेच्या डिसाळ नियोजनामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी शेतकरी बँकेला जातात परंतु सदरील बँकेच्या शाखा अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी केवायसी पासून वंचित असल्याने सदरील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे
सदरच्या बँक शाखा अधिकारी यांनी केवायसी करण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय कांग्रेस परिवार विजय कुमार पाटील मोरे यांनी केली आहे
पंतप्रधान किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणारी दरमहा पाचशे रुपये तर चार महिन्याचे दोन हजार रुपये हे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्यात केवायसी करावी लागत असताना सुद्धा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केवायसी करण्यास विलंब लावत असल्यामुळे काही दिवसातच शेतकऱ्यांचे पीएम योजने अंतर्गत चे दोन हजार पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे
बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून लक्ष दूर करीत असल्याचेही शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे
तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेसह आणि बँकेने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून कागदपत्र मागितले आहेत परंतु शेतकऱ्यांनी मोठा खटाटोप करून आणून देत आहेत परंतु बँके कडून कागद पत्रे घेऊन कचरा कुंडीत टाकत असल्याचे निवेदन कर्त्यांचे म्हणणे आहे

0 Comments