विशेष प्रतिनिधी बाळासाहेब पांडे -
एकता दुर्गा महोत्सव नायगाव बा.च्या वतीने दि. 1 अकटोंबर शनिवार रोजी नायगाव च्या मोंढा मैदान येथे सायंकाळी सात वा.ज्यु. फिल्म स्टारचा बहारदार हास्य विनोद व ऍक्शन टू धमाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या मध्ये ज्यु.सलमान खान,ज्यू.जॉनीलिव्हर
ज्यू.सचिन तेंडुलकर, दीपाली, यांची हजेरी लागणार आहे
माजी आ. वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने तब्बल २२ वर्षापासून नायगाव येथे दुर्गा देवीची स्थापन करण्यात येत या असून गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या कालावधीने विविध कार्यक्रम साजरे करता आले नाहीत.यामुळे नायगाव च्या क्लावन्त प्रेमी रसिकांची भूक भागवणे अवघड झाले होते
त्याची कसर भरून काढण्यासाठी एकता दुर्गा मंडळ अध्यक्ष विजय पा चव्हाण यांनी या वर्षी विद्यार्थ्यांच्या डान्स स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा,भजन,आदी कार्यक्रमा बरोबरच नायगावचा प्रख्यात क्लावन्त ज्यू.जॉनीलिव्हर उर्फ रामेशवर भालेराव यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम ठेवला आहे.
सन २०२२ मध्ये एकता दुर्गा फेस्टिव्हल महोत्सवात संबंध राज्यात सुप्रसिद्ध असलेले नायगांवचे भूमिपुत्र रामेश्वर भालेराव तथा ज्युनिअर जॉनी लिव्हर,ज्यू. सह सलमान खान, ज्यू.सचिन तेंडूलकर, दिपाली या ज्युनिअर फिल्मस्टार कलाकारांचा ऑर्केस्ट्रा नायगांव येथे शनिवारी धमाल करणार असल्याने रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष तथा मित्र मंडळ अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे.

0 Comments