नागोराव शिंदे -
शहरात दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील एक अल्पवयीन मुलगी आई-वडिलांनी मोबाईल न घेऊन दिल्याच्या रागात शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडली व शाळेत न जाता ती आदिलाबाद रेल्वे ने घर सोडून निघून जात होती त्या दरम्यान कमलाबाई दिगंबर भांगे या महिलेला ती रेल्वे मध्ये मिळाली त्यामुळे हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेल्याची तक्रार देण्यात आली होती त्या घटनेचा तपास हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावून त्या मुलीस सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बी. डी.भुसनुर यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरात शिकत असलेल्या एका शाळकरी मुलीने आपल्या आई-वडिलास मला मोबाईल घेऊन द्या असा अट्टाहास लावल्याने आई वडिलांनी मोबाईल न घेऊन दिल्याच्या रागाच्या भरात त्या मुलीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी शाळेत न जाता आदिलाबाद रेल्वेने पाहुण्याच्या घरी जाण्याचे ठरवले तेव्हा वडिलांनी ठिकठिकाणी शोध घेतला पण मुलगी घरी परत न आल्याने त्यांनी हिमायतनगर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फुस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल केली त्यामुळे हिमायतनगर पोलीस स्थानकात गु. र. न २१७ / २०२२ भा. द. वी. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास जलद गतीने करण्यासाठी पी.एस.आय.स्मिता जाधव यांच्याकडे देण्यात आला होता
पोलिसांना तपासा दरम्यान सहकार्य करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी केला सन्मान..

0 Comments