Header Ads Widget

भोकरच्या काही भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या टॉकी जवळील रस्त्यावर मृत जनावरे कोण्या मालकाचे ? कुत्रे व पक्षी माँस खाऊन दुर्गधी ; जबाबदारी कोणाची !!

भोकर विजय कुमार पाटील मोरे-

नांदेड जिल्ह्याच्या भोकर येथे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टॉकीचे बांधकाम लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आले परंतु या टॉकीच्या काही अंतरावर मृतमुखी पडलेले जनावरे कोणी तरी आणून टाकल्याने जनावरे बेवारस मृत मुखी अवस्थेत दिसून येत आहेत

सदरच्या पाण्याच्या टॉकी जवळ त्या जनावराचे मांस खाण्यासाठी कुत्रे व पक्षी जात असल्यामुळे सदरच्या मृत्यु मुखी पडलेल्या जनावराच्या प्रेतांचे सर्वत्र येणार्‍या-जाणार्‍या लोकांना दुर्गंधी वास येत असल्याने थोडक्यात नागरिक हैराण असल्याचे  सांगण्यात येत आहे 
 भोकर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टॉकीच्या आजु बाजुला मृत अवस्थेत टाकलेले जनावरे कोणत्या मालकाचे ? असा प्रश्नन जनसामान्य माणसांना पडला असून सदरची बाब स्थानिक प्रशासनाला आणून नागरिकांनी आणून दिल्यास पाण्याच्या टॉकी जवळ स्वच्छता राहण्याची शक्यता वर्तवली जात  आहें

 सदरच्या मृत्यु मुखी पडलेल्या जनावरांचे मास कुत्रे व पक्षी खाल्याच्या नंतर सर्वत्र कुत्रे परिसरात भटकत असल्याचे दिसून येत असून त्याच बरोबर पक्षी सुद्धा पाण्याच्या टॉकीवर जाऊ बसत असल्याचे चित्र दररोज पाहवयास मिळत आहे 
 महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासन नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून नेहमी प्रयत्नन करीत असते परंतु सदरच्या या हायवे मार्गावर असलेल्या टॉकीच्या अवती भवती चक्क मृत अवस्थेत जनावरे टाकून दिले जात
असल्यामुळे सदरच्या जनावराचा अतिशय दुर्गधी वास सर्वत्र पसरत असल्याने सदरची बाब प्रशासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन पाण्याच्या टॉकी भवताल जागा गहाण झाली असल्याने संबंधित प्रशासनानी साफ करावी अशी मागणी सुज्ञान नागरिकांतून करण्यात येत असून या पाण्याच्या टॉकीकडे प्रशासनाने विशेष लक्ष देईल अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे 

Post a Comment

0 Comments