Header Ads Widget

ग्रामपंचायत कार्यालय अंतरगाव येथे दुसऱ्या टप्प्यात थेट जनतेतून सरपंच पदाची निवड गाववासीयांचा भेटी घाटीवर जोर ? -


   
      माधव पवार 
निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुका असो लोकसभा असो की विधानसभा अथवा जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायतच्या निवडणूका जाहीर केल्याच्या नंतर इच्छुक उमेदवारासह ग्रामपंचायत निवडणूकीच्या 
संदर्भात असो इच्छुकांना मोठी उत्सुकता असते त्याच पद्धतीने आपआपले उमेदवारी उभे करण्यासाठी धावपट्टीवरची खेळी खेळावी लागते तशाच पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीचे वारे प्रोग्राम जाहीर झाल्यामुळे वाहू लागले आहेत
नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथे नागरिक व इच्छुक लोकांनी सदरच्या ग्रामपंचायतीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात असताना सुद्धा आत्ता पासूनच गावांतर्गत इच्छुक उमेदवाराची व मतदाराची बैठकी घेत असल्याची चर्चा होत खेड्यापाड्यात  होताना ऐकावयास मिळत  असली येथे तिसरी आघाडी होण्याची शक्यता ? आहे

आंतरगावात चव्हाण गटात दोन गट प्रकाश पाटील शिंदे, 
पॅनल प्रमुख आणि कवळे गुरुजी गट आणि भाजपाचा एक गट ?  -

तालुक्यातील आंतरगाव येथे असून गाव आणि माझा सरपंच आपलाच असला पाहिजे असे पार्टी प्रमुखाना 
वाटणे साहजिक असून आंतरगाव येथे दोन पार्टी खंबीर असल्या तरी या ठिकाणी जनतेतुन थेट सरपंच पदाची निवड होत असल्यामुळे तिसरी आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात असून यंदा ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक जाहीर झाली असली तरी दुसऱ्या टप्यात असल्याचे सांगण्यात येते गावच्या दृष्टींकोनातून
 सरपंच पद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे अनेकांना सरपंच होण्याचे स्वप्न आता पासूनच लागले असले तरी सदरच्या निवडनुका दुसऱ्या टप्प्यात आहेत येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीसाठी मोठी आता पासूनच खेळी खेळल्या जात असल्याचे व्रत आहे
प्रशासनाने सदरच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर व राबविले असल्यामुळे या गावात दोन पॅनल प्रमुख अनेक निवडणुकीत आपले अचूक उमेदवार उभे करतात परंतु यंदा सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्यामुळे तिसरी आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

आंतरगाव येथे ग्रामपंचायतच्या निवडणूकीची जंग पचाडण्यासाठी गावातील विश्वासु उमेदवाराची शोध माहीम सध्या तरी चालू असून उमेदवार उपलब्ध झाले असले तरी सरपंच पदाची थेट निवड जनतेतून  होणार असल्यामुळे या ठिकाणी कोणताही व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होणार का ? ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीसाठी येथील सक्षम असलेले लोक व या गावात वार्ड तीन आहेत सदरची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments