Header Ads Widget

देगलूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव सुगावे यांचा घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन - देविदास पाटील सुगावे यांची माहिती

       माधव पवार 
 नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले तथा गावचे भूमिपुत्र आणि देगलूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव माधवराव माली पाटील सुगावे यांनी गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सेवेत अतिशय उत्कृष्टपणे काम करून सेवानिवृत्त होत असल्यामुळे घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देविदास बापूराव पाटील सुगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
तालुक्यातील घुंगराळा नगरी येथील रहिवासी असलेले व देगलूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी साहेबराव माधवराव माली पाटील सुगावे यांनी गावच्या राजकारणा बरोबर प्रशासकीय सेवेत उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून आपला एक प्रकारचा वेगळाच ठसा उमटून दाखविला असल्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असल्यामुळे गावकऱ्यासह ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने साहेबराव माधवराव पाटील सुगावे यानी सेवेतून कार्यमुक्त होत असून त्यांचा गावच्या मार्फत आणि गावचा स्वाभिमान व भूमिपुत्र म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देविदास पाटील सुगावे यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments