Header Ads Widget

जेष्ठ पत्रकाराच्या उपस्थित एका नामवंत कलाकाराची साउंड सर्व्हिस संघटना भोकरच्या अध्यक्षपदी माधव वाघमारे तर उपध्याक्षपदी उमेश डोखळे आणि सचिन पदी अमोल रावळे यांची निवड -

      माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील रहिवासी असलेले व हल्ली मुक्काम भोकर येथे वास्तव्यास असलेले आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे आणि कला गुणाने भरीव असे गुण संपन्न असलेले माधव नागोराव वाघमारे ( एन एस ) यांची भोकरच्या साउंड सर्व्हिस संघटनेच्या माध्यमातून नुकतीच कार्यकारणी जाहीर झाली या दरम्यान जेष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखली सदरची बैठक घेण्यात आली होती
या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि सर्व व्यपाऱ्याच्या उपस्थित साउंड सर्व्हिस भोकरच्या अध्यक्षपदी माधव वाघमारे तर उपध्याक्षपदी उमेश डोखळे सचिन पदी अमोल रावळे यांची निवड  करण्यात आली यावेळी कोषाध्यक्ष नीरंजन कदम, सहसचिव मारोती कवडे, सल्लगार बाबुराव पाटील, के वाय देवकांबळे, सदस्य शिवाजी कदम, नागेश पाटील, तातेराव कुंचलवार, चंद्रशेखर चेवले, सचिन पडोळे, मारोती राठोड, नारायण कोंगेवाड, यांची यावेळी निवड करण्यात आली 
शहरातील भोकर ते किनवट रस्त्यावर असलेल्या बालाजी भट मंगल कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या
महत्वपूर्ण बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांच्यासह व्यापाऱ्याच्या विशेष उपस्थितीत यावेळी टेन्ट हाऊस तसेच साउंड सर्व्हिस लॉडिस्पीकर भोकर येथील संघटनेच्या अध्यक्ष पदी माधव उर्फ नितीश वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या निवडी बदल सर्वत्र विविध क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे 
 

Post a Comment

0 Comments