Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघासह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पोलीस पाटलांच्या अनेक जागा रिक्त कधी भरणार ह्या जागा ? जनतेचा सवाल !!

     माधव पवार

नायगाव  विधानसभा मतदार संघासह ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यातील अतिशय महत्वाचे पद असलेल्या पोलीस पाटलांच्या रिक्त जागा अनेक वर्षापासून असल्यामुळे त्या सदरच्या जागा कधी भरणार असा सवाल जनतेनी केला असून प्रशासनाच्या बेदखल कारभारामुळे सदरच्या जागा रिक्त असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात असून नायगाव तालुक्याची परिस्थिती पाहिली तर अनेक गावात पोलिस पाटलांच्या जागा रिक्त असल्याचे सरळ सरळ चित्र स्पष्ट दिसून येत आहे

नायगाव मतदार संघातील पोलीस पाटील यांच्या जागा रिक्त झाल्याने अनेक गावे पोलीस पाटला विना वार्‍यावर असल्याचे गावकऱ्यातुन बोलल्या जात असून गावातील पोलिस पाटील पद हे अतिशय महत्त्वाचे मानल्या जात असल्याने व संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांचे काम नेहमीसाठी पोलीस ठाण्याच्या निगडित  असल्याने पोलीस पाटलाचे कामे नेहमीसाठी ठाण्याकडे पडत असतात हे मात्र सत्य आहे

खेड्यापाड्यातील गावात कुठे काही अनुचित प्रकार घडल्या नंतर सदरची बाब ठाण्याच्या ठाणे प्रमुखांनी एक विश्वासाचे नाते म्हणून पोलीस पाटील यांना विचारल्या जातात परंतु अनेक गावात पोलिस पाटलांची नेमणूक करण्यात आली नसल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळी वरील हालचालीं बाबत पोलीस
प्रशासनाला माहीती उपलब्ध करून देत असतो. पोलीस पाटील या नेमणुकी वरील व्यक्ती ही त्याच गावची असल्याने सर्वाना ओळखत असते  " खेड्यापाड्यातील " पोलीस पाटलाच्या रिक्त जागा भरा प्रशासनाकडे मागणीचा जोर "

ग्रह विभाग असो की महाराष्ट्र शासन असो नायगाव विधानसभा मतदार संघातील धर्माबाद उमरी नायगाव या तालुक्याच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील बऱ्याच पैकी गावात पोलीस पाटील नसल्याने अनेक कामे खोळंबून जात असल्याचे ही गावकऱ्यातून बोलल्या जात असून पोलीस पाटलांच्या रिक्त जागा असलेल्या ठिकाणी शासनाने तात्काळ जागा भरून पोलिस पाटलांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरीत असून सदरच्या मागणीकडे गांभीर्याने प्रशासन लक्ष देऊन पोलीस पाटलांच्या रिक्त जागा भराव्यात असे जनतेतून बोलल्या जात आहें 


Post a Comment

0 Comments