बरबडा : किरण हणमंते
बरबडा येथे विविध ठिकाणी दुर्गा मंडळाची स्थापना
बरबडा :- बरबडा येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वेगवेगळ्या गल्ली-गल्लीत असे दुर्गा देवी ची स्थापना करण्यात आली आहे. बरबडा या गावामध्ये विविध ठिकाणी अनेक दुर्गा देवींची स्थापना करण्यात आली आहे.
सोमवारी घटस्थापना झाली. " दुर्गा माता कि जय " याने जयघोष करीत आणण्यात आले.प्रत्येक दुर्गा मंडळाने सुंदर आकर्षक असे डेकोरेशन व लाइटिंग करण्यात आले आहे. त्या मंडळाच्या सानिध्यात प्रसन्न वाटेल असे वातावरण आहे. आता नऊ दिवस दुर्गा देवी ची आरती ने गाव मंत्र मुग्ध होणार आहे काही दुर्गा मंडळाच्या वतीने सामाजिक विविध उपक्रम राबविले जात आहेत
त्यामध्ये किर्तन, संगीत खुर्ची, एकांकी पात्र नाटक, व्याख्यान वेगवेगळ्या पद्धतीने रोषणाई करून आकर्षक देखावे सादर केले जातात. यावेळी अनेक दुर्गा मंडळानी स्थापना केले त्यामध्ये येताळेश्वर दुर्गा मंडळ बसस्टॅन्ड, लोकमान्य दुर्गा मंडळ पेठ गल्ली, लोकप्रिय दुर्गा मंडळ लोकप्रिय चौक, कपिलेश्वर दुर्गा मंडळ महादेव मंदिर, आर्यवैश दुर्गा मंडळ विठ्ठल मंदिर, श्री शिव छत्रपती दुर्गा मंडळ चावडी, वाल्मिकी दुर्गा मंडळ पोचम्मा गल्ली,
श्री छत्रपती संभाजी दुर्गा मंडळ संभाजी राजे चौक, भुवनेश्वरी दुर्गा मंडळ फरशी, जय माता दि दुर्गा मंडळ भंडरवाड गल्ली, श्री ओम दुर्गा मंडळ शिवाजी चौक, नागोबा दुर्गा मंडळ नागोबा मंदिर, बालशक्ती दुर्गा मंडळ गोविंद नगर, जय माता दि दुर्गा मंडळ नाथ गल्ली, श्री एकता दुर्गा मंडळ मौलाली गल्ली, दत्त दुर्गा मंडळ दत्त मंदिर, श्रीराम दुर्गा मंडळ पुनर्वसन इत्यादी दुर्गा मंडळे आहेत.
या नवरात्र महोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुण चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी कुंटूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रमेश निखाते, जमादार लक्ष्मण सोनकांबळे, पोलिस पाटिल प्रतिनिधी संजय कानगुले, शिपाई खंडू मुंडफळे यांनी ठेवला आहे.

0 Comments