Header Ads Widget

नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांच्या कडुन कुमारी साक्षी खैरनारचे अभिनंदन !!

     मधुकर जवळे 
नायगाव तालुक्यात नीट परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असल्यामुळे नीट परिक्षेत कु. साक्षी दिलीपराव खैरनार ही मुलगी सदरच्या परीक्षेत ७२० गुणां पैकी ६३९ गुण घेऊन उत्तीर्ण झाली झाली असल्यामुळे नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी अभिनंदन केले नाशिक जिल्हयातील रहिवासी व सध्या ग्रामविकास अधिकारी म्हणून टेंभुर्णी तालुका नायगाव येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी दिलीपराव खैरनार यांची कन्या नुकतेच यश प्राप्त केले असल्यामुळे विविध क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे
कुमारी साक्षी दिलीपराव खैरनार हिने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादित केल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी एम.बी.बी.एस. शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे 

नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर , सचिव सुर्यकांत बोंडले , रविराज नव्हारे , प्रल्हाद गोरे , साईनाथ चव्हाण , अशोक कदम , निलेश कुलकर्णी , विनोद झुंजुरे , यादव सुर्यवंशी नागेश यरसनवार ,व्यंकटेश पाटील , प्रकाश नेरलेवाड , सदाशिव आगलावे यांच्यासह ग्रामसेवक  ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक संघटना नायगाव आदीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments