नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे
दि.२३सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "राडा" या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो नायगाव शहरतील कै.डी.बी.पाटील होटाळकर कॅम्पसमध्ये मिलेनियम पब्लिक स्कूल नायगाव च्या भव्य मैदानावर पार पडला आहे
या सोहळयाचे उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टी नांदेडच्यामहिला आघाडीच्या युवा नेत्या प्रणिती ताई देवरे पाटील चिखलीकर या होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.शिवराज पाटील होटाळकर (भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड) हे होते. मुख्य आकर्षक राडा चित्रपटाचे नायक आकाश शेट्टी व दिगदर्शक रितेश नरवाडे सह सर्व कलावंत व बालाजीराव बच्चेवार, (मा. जि प सदस्य नांदेड) . माणिकरावजी लोहगावे (मा. जि प सदस्य नांदेड ). जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे शिवाजी वडजे,शिवाजी पा सावरखेडकर, या सह अनेकांची मंचकावर उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्विते साठी शिवराज पाटील होटाळकर मित्रमंडळाचे दिलीप पांढरे, दत्ता पाटील इज्जतगावकर, गंगाधर पाटील कल्याण, .शंकर पाटील कल्याण. कैलास भालेराव. शिवा पाटील गडगेकर .राहुल पाटील नकाते, सुरेश पाटील खंडगावकर. गोविंद पाटील शिंदे . चंद्रकांत पाटील चव्हाण .गजानन पाटील चव्हाण .प्रदीप देमेवार ,शिवाजी पाटील पवार , दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राचार्य फाजगे सर. प्राचार्य कोत्तेवार सर प्राचार्य सूर्यवंशी सर प्राचार्य घोगरे,मु.अ.सुनंदा बाळासाहेब पांडे,मु.अ.रुपेश पवार,व त्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केले . चित्रपटातील मुख्य अभिनेता आकाश शेट्टी ,योगिता चव्हाण ,अजय राठोड.निकिता पंडित,रितेश नरवाडे, सतीश कासेवार,लचछु देशमुख,राम चव्हाण,रवी जाधव,संभाजी हंमद सागर पतंगे. यांनी आपल्या कलाकुसरीच्या माध्यमातून व चित्रपटातील डायलॉग बाजी व विनोदी किसे सांगत उपस्थित विद्यार्थी व रसिक श्रोते यांचे मनोरंजन केले आहे
तर यमुनाबाई मा.व.उच्च.मा.शाळा व मिलिनीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांनी लावणी व मराठी हिंदी चित्रपट गाणी यावर नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. माधव भिसे या बाल कलावंताने सादर केलेले इमली के पिछे क्या है हे गीत व कलाकृती उपस्थितांनचे मन वेधले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार, व सोनमंनकर सर यांनी केले.तर मिलिनीयमचे संगीतअध्यापक गणेश पांचाळ व विद्यार्थी यांनी सादर केलेले स्वागत गीत व संगीत इन्स्टयुमेंट सर्वांचे लक्ष वेधले सादर केले. आभार प्रदर्शन बापूले सर यांनी मानले



0 Comments