Header Ads Widget

आईचा विटकरीने ठेचून खून करणारा खुनी चुडावा पोलिसाच्या हाती सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी ८ तासातच केले जेरबंद माया ममतेला काळीमा फासणारी पिंपरण येथील घटना -

 माधव पवार / सय्यद कलीम / पूर्णा / 

पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पिंपरण या गावातील रहिवासी असलेल्या एकोण सत्तर वृद्ध महिलेचा डोक्यात विटकरी घालून तिच्या सख्या मुलाने दारूच्या नशेत खून केल्याची घटना उघडकीस आली असल्यामुळे चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे सदर घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केले 
आज्ञात आरोपीच्या शोधात पोलीस चक्र जलद गतीने फिरवून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला असता मयत सुलोचनाबाई शंकराव सोनटक्के हिच्या सख्या मुलाने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सपोनि मुळे यांनी नायगाव फास्ट न्यूज शी बोलताना सांगितले आहेतालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलीस निरीक्षक शिव प्रकाश मुळे यांनी सदर घटनेचा छडा लावण्यासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलद गतीने केल्यामुळे आईचा खुनी मुलगा असे तपासात निष्पन्न झाल्याच्या नंतर सदरील आईचा खून करणाऱ्या तळीराम आरोपीचे नाव मारोती शंकरराव सोनटक्के वय ३८ वर्ष राहणार पिंपरण यांनी मयत माता सुलोचना शंकरराव सोनटक्के हिचा दारूच्या नशेत डोक्यात विटकरी घालून खून केल्याची चुडावा पोलिसांना कबुली दिली आहे चुडावा पोलीस ठाण्यात फिर्यादी  गजानन नागनाथ सोनटक्के वय २७ वर्ष धंदा मजुरी राहणार पिंपरी तालुका पूर्णा जिल्हा परभणी हल्ली मुक्काम जुना  कवठा नांदेड यांनी दिल्या वरून आरोपीच्या विरोधात  गु.र.न १३८ / २०२२ कलम ३०२ भा.द.वि  प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शिवप्रकाश मुळे हे करीत आहेत 
पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हानंद गावडे यांच्या आदेशानुसार चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि शिवप्रकाश मुळे यांच्यासह फौजदार पंडित, पोहेका सावंत, पोहेका रफिक शेख पॉ.का मीटके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी लाल दिव्याची गती वाढवून पिंपरण येथे घडलेल्या घटनेतील खुनी मुलांना केवळ आठ तासातच दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी अटक केल्याचे केली सांगितले आहे

मुलां कडून करण्यात आलेली हत्या ही माय ममतेचा काळिमा फासणारी घटना घडली आहे







Post a Comment

0 Comments