आहेदिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीन ही धुरा सांभाळल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा सिनेमा के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या ॲक्शनपटात आता आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल आणि येत्या २३ सप्टेंबर २०२२ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे
येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या "राडा" या मराठी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, या चित्रपटात नायगाव तालुक्यातील एका हरहुन्नरी कलाकारांने ही छोटीशी भूमिका साकारली तालुक्यात असलेल्या बरबडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी महादजी शेवाळे यांचा ही या चित्रपटामध्ये छोटा अभिनय असून, अंगात कौशल्य असल्यावर ग्रामीण भागातील कलाकारांना देखील व्यासपीठ मिळू शकते हे यातून स्पष्ट होताना दिसून येते. शिक्षकी पेशा असलेले शिवाजी शेवाळे यांनी नवद्दीच्या दशकात अनेक नाटकात काम केलं आहे
नाटकातील अभिनय आजही या भगातील लोकांच्या स्मरणात आहेत.शिवाय रत्नेश्र्वरीचा महिमा या भक्तिगीताच्या अल्बम मध्ये त्यांनी एका गाण्यात सुंदर अभिनय केला आहे.जालना येथे संपन्न झालेल्या समूहगीत गायन स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता.अध्यापन करताना देखील त्यांची खास शैली विद्यार्थ्यांना मोहून टाकते.अशा कलागुण संपन्न शिक्षकाला मागील वर्षी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.या चित्रपटाचं चित्रीकरण नांदेड जिह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करण्यात आला आहे
नवोदित अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. आकाश शेट्टी सह, योगिता चव्हाण हे नवोदित चेहरे या चित्रपटात दिसणार असून त्यांच्यासोबतच मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड अशी तगडी सिनेमंडळी या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली आहे.राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशनचा हा चित्रपट आहे.

0 Comments