Header Ads Widget

हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या यांच्या धक्कादायक माहितीमुळे जनतेसह शेतकरी हैराण -



नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क : - माधव पवार

थेट मुबई - अंदाज पावसाचा -- !! ---!!---

सद्यस्थितीत पडणारा पाऊस हा आणखी चार महिने कोसळणार असून सप्टेंबर अखेर पाऊस आणखी वाढण्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. महापूरांचा धोका कायम असून चार महिने मान्सून पुढे सरकला असल्याचा प्राथमिक परंतू अतिशय धक्कादायक निष्कर्ष त्यांनी काढला असून या वर्षी हिवाळ्याचा आनंद जनतेला लुटता येणार नाही काय ? असे आता ग्रामीण भागात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे.

साधारणत: मान्सून ०१ जूनला सुरू होतो आणि तो ३० सप्टेंबरला संपतो. मात्र यावेळी जवळपास चार महिने मान्सून पुढे सरकला आहे. आगामी दसरा-दिवाळीचे सण मुसळधार पावसातच साजरे करावे लागतील, तसेच जानेवारी अखेर पर्यंत पाऊस बरसेल आणि फेब्रुवारीत देखील पाऊस दिसू शकेल, असा अंदाज जोहरे यांनी व्यक्त केला असल्यामुळे यंदा पावसाची अजबच काहणी जनतेसह शेतकऱ्यां समोर आली आहे.माहितीनुसार, ४ ऑक्टोबर नंतर निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती प्रक्रीया वाढीस लागेल आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरु होईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली असल्यामुळे शेतकरी गट भलताच हैराण होताना दिसूम येत आहे. 

विशेष म्हणजे यावर्षी अद्याप एकही प्रबळ चक्रीवादळ तयार झालेले नाही ही देखील गंभीर बाब आहे. मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नच्या ‘न्यू नॉर्मल’ला शेतक-यांनी व जनसामान्यांनी येत्या काळात घाबरून न जाता मान्सूनच्या नव्या पॅटर्नला स्वीकारावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले असले तरी शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे आता अजून पावासाळ्याच्या झळा बसणार आहेत असे शेतकऱ्यांतुन बोलल्या जात आहे 

ऑक्टोबर मध्ये ही पावसाचे प्रमाण राहणार आहे. ऑक्टोबरनंतर पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होऊन पावसाळा जानेवारी पर्यंत लांबणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस दिर्घकाळ आव्हाने देत ठाण मांडणार आहे. यंदा तब्बल जुलैत झालेला पाऊस सुर्यावरील चुंबकीय वादळांमुळे झाला.



Post a Comment

0 Comments