Header Ads Widget

कंधार तालुक्यातील शिराढोणच्या भूमीपुत्रवार शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार शहीद जवान राजेश्वर भुरे अमर है अमर है 🌹गाववासियांसाठी मंगळवार हा काळा दिवस -

माधव पवार /   शिवकांत डांगे - शिराढोण -

जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथील रहिवासी असलेल्या भूमिपुत्रावर दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोज मंगळवारी सकाळी ठीक ११ वाजून तीस मिनिटांनी शहीद राजेश्वर आनंदराव भुरे यांचे पार्थियावर कंधार तालुक्यातील शिराढोणच्या पवित्र भूमीत शहीद जवानांवर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अंतिम दर्शन घेण्यासाठी शहीद जवानाचे पार्थिव ठेवण्यात आले होते शहीद जवानाचे पार्थिव पाहून भुरे कुटुंबियांसह शिराढोण वासियांनी पार्थिवची पेटी पाहताच हंबरडा फोडला असून परिसरातील नातेवाइकांनी व गावातील जनतेने अंत्यदर्शन घेतल्या नंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली असल्याचे व्रत आहे 
तालुक्यातील शिराढोण येथे यावेळी शहीद जवानाचे पार्थिव फुलांनी सजविलेला ट्रॅक्टरवर ठेवण्यात आले सदरच्या अंत्ययात्रेच्या पुढे भारतीय तिरंगा ध्वज घेऊन तरुण शोकाकुल वातावरणात चालत
राजेश्वर आनंदराव भुरे तुम अमर है अमर है असे म्हणत अंत्ययात्रा चालू करण्यात आली यावेळी त्याच्या राहत्या घरा पासून ते पूर्ण गावाला अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार ठिकाणा पर्यंतच्या मार्गावर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांची सजविण्यात आले होते तसेच जागोजागी तिरंगा ध्वज भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते
याप्रसंगी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर शोककळा पसरली होती तसेच पार्थिवच्या समोर चालत असलेल्या डीजे वर देशभक्तीपर गीते वाजवीत संपूर्ण यात्रा संचारली आहे 

"”दुकाने शोकाकुल वातावरणात  बंद ठेवली होती "''

दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी देशभक्त वीर जवान राजेश्वर भुरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला सकाळ पासून 
 गावातील दुकानदार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने शोकाकुल वातावरणात  स्वतःहून बंद ठेवून अंत्ययात्रेसाठी सहभागी झाले होते.

यावेळी यात्रेत शिराढोण गावातील व गावोगावीवरून आलेल्या तरुणाई, महिला, व ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा अंत्यसंस्कार स्थळी पोहोचली. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी, सैनिक दलातील आजी-माजी सैनिक, प्रशासनातील अधिकारी व गावकऱ्यांनी शहीद जवान राजेश्वर भुरे यांना पुष्पचक्र व फुले, हार वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीद जवान भुरे यांचे भाऊ ओम भुरे व मुलगा यांनी शहीद जवानाला अखेरची अग्नी दिली त्यावेळी काय दुःख झाले असावे हे शहीद जवानाच्या कुटूंबातील व्यक्तिमत्वाला काय वाटले असावे -


Post a Comment

0 Comments