नायगाव फास्ट न्यूज थेट नेटवर्क - जळगाव -
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गलंगी येथील रहिवासी असलेले आदिवासी कुटूंबातीलवडीलासह मुलाचे किरकोळ भांडण झाले असल्याचे सांगण्यात येते सदरच्या भांडणात मुलाने सावत्र आईचा खून केल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर येत असून सदरच्या सावत्र आईच्या डोक्यात मुलाने लाकडाच्या दांड्याने मारहाण केल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
घटनेची माहिती मिळाल्या नुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण,उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्यांनी घटनास्थळी रवाना झाले व मयत महिलेचा संशयीत मुलगा यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहें
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील गलंगी येथील खळ्यात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील मुलानी सावत्रा आईची हत्या केली बाप लेकाच्या भांडणा नंतर सावत्र आईने या भांडणात येऊन त्या मुलांना तु येथून निघून जा म्हणताच त्या मुलाच्या डोक्याचा पारा चढला आणि रागाच्या भरात त्या आईच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारून हत्या केली करण्यात आली असल्याचे वार्ता सर्वत्र पसरली आहे

0 Comments