Header Ads Widget

जिल्हाचे प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांचा खुशल नेतृत्वाचा दिलखुलास असा कारभार !!

       माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची नांदेड येथून नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली व दिनांक १८ऑगस्ट २०२२ त्यांचे बदलीचे आदेश मिळताच डॉ इटनकर हे कार्यमुक्त झाल्या नंतर नांदेड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून इटनकर यांच्या जाग्यावर खुशल नेतृत्वाचे खुशाल सिंग परदेशी यांना जिल्हाचा पदभार दिला असल्यामुळे जिल्ह्याचा खुशाल कारभार चालत असल्यामुळे जनतेतुन समाधान व्यक्त केल्या जात आहे
जिल्हाचा पदभार स्विकारलेले प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून खुशाल सिंग परदेशी यांचा स्वच्छ प्रतिमेचा कारभार चालत असल्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यानी शेतकऱ्यांच्या सुखा दुःखासह विध्यार्थीच्या शिक्षणाचे लक्ष केंद्रीत करून शिक्षणाचा दर्जा वाढवून आदर्श विध्यार्थी व स्वालंबी झाले पाहिजे हा डोळस विचार केंद्रित करून शिक्षणावर भर दयावे असे पालकांतुन बोलल्या जातं असून त्याच बरोबर शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान बँके खात्यात मिळतील असे आदेश दयावेत हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे
जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी कार्य होण्या अगोदर जिल्हाधिकारी पदाचा कारभार अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांच्या कडे देण्यात आला असल्यामुळे खुशल नेतृत्वाचा खुशाल प्रभारी जिल्हाधिकारी मिळाला असल्यामुळे अनेकाच्या समस्याचे निवारण होत असल्याची चर्चा ग्रामीण भागात होताना ऐकावयास मिळत असले तरी प्रशासनाने अधिकृत जिल्हाअधिकाऱ्याचे अद्याप आदेश काढले नसल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments