शंकरनगर येथील श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे नेत्र दीपक यश पाच पदकांची कमाई शंकरनगर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत नुकत्याच झालेल्या "क" झोन आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयाने तीन सुवर्ण पदक एक रजत पदक व एक रोप्य पदक असे एकूण पाच पदक पटकाविले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या बी. एससी. द्वितीय वर्षातील विद्यार्थी राजेश्वर राजेंद्र सोनकांबळे याने सुवर्णपदक पटकाविले आहे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व उत्कर्ष महाविद्यालय सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने सगरोळी येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत म्हणजेच ऍथलेटिक्स स्पर्धेत महाविद्यालयाच्या बी. कॉम. प्रथम वर्षाचा विद्यार्थी कृष्णा शंकर देवारे याने भालाफेक मध्ये सुवर्णपदक, थाळीफेक मध्ये सुवर्णपदक व गोळा फेक मध्ये रजत पदक जिंकले.आहे
त्याच ठिकाणी बी. एससी. प्रथम वर्षाचा सुमित शिवलिंग कोकणे याने गोळा फेक मध्ये रोप्य पदक मिळवले. एकूण क झोनच्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला नेत्र दीपक असे यश मिळाले आहे.
तीन सुवर्णपदक एक रजत पदक व एक रोप्य पदक असे एकूण पाच पदक पटकावून महाविद्यालयाने नेत्रदीपक असे यश मिळविले आहे. राजेश्वर सोनकांबळे, शंकर देवारे, कृष्णा देवारे व सुमित कोकणे या चारही यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे गोदावरी मनावर चॅरिटेबल ट्रस्ट शंकर नगर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री भास्कर रावजी पाटील खतगावकर साहेब, संस्थेच्या सचिव व नांदेड
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आदरणीय डॉ. सौ मीनल ताई निरंजन पाटील खतगावकर मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटोदे सर, श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री धनंजय शेळके सर व महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रभारी क्रीडा संचालक व मार्गदर्शक प्रा. गोविंदराज पांचाळ , महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे माजी क्रीडा संचालक प्रा. डॉ. बालाजी जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
त्याचबरोबर या गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या क्रीडा समितीचे सदस्य प्रा. डॉ. सुनील कदम, प्रा .डॉ. बालाजी डाकोरे, प्रा. डॉ. विलास वानखेडे, प्रा. डॉ. शिवांजली वारले, प्रा बालाजी बोटेवाड, प्रा. सचिन बोगुलवार, प्रा. पडलवार तसेच श्री साहेबराव पाटील बावणे, श्री गंगाधर देवारे, श्री शंकर मुळे श्री प्रकाश वाघमारे , श्री नारायण जांभळे, श्री कृष्णा भंडरवार, श्री अमोल जिगळेकर , श्री साई बावणे व महाविद्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments