महाराष्ट्र राज्यातील सत्ताधाऱ्यांनो शेतकऱ्यांच्या गळ्याला पडून चालणार नाही बस झाला तुमचा पुळका राज्यातील पीक पाहणी तात्काळ दौरे बंद करून शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट ५० हजार रुपये हेक्टरी अनुदान व पीक विमा तात्काळ जमा करून जगाच्या पोशिंदाला धीर दिला पाहिजे कारण शेतकरी राजा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे
राज्यात कोरडा दुष्काळ पडला असताना सुद्धा राज्याच्या सत्तेतील मंत्री संत्री व या सरकारतील आमदार खासदार पालकमंत्री यांचे नुसते दौरेच दौरे होत असताना दिसून येत आहेत
शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे त्याना संकटातून बाहेर काढण्यासाठी या राज्यातील सरकार मोठे प्रयत्न केले पाहिजे आहे
सत्ताधाऱ्यानो तुम्ही जर तुमचे पीक पाहणीचे दौरे जास्तीचे केल्यास शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मिळणार नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी राज्यातील दौरे बंद करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान व पीक विमा देण्यात यावेत
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दीपावली पूर्वी सदरचे अनुदान व पीक विमा जमा करण्यात यावे अशी मागणी शेतकरी राजा पण करण्यात येत आहे

0 Comments