Header Ads Widget

दुष्काळाच्या संकटात शेतकरी होरपळत असताना सुद्धा नायगावच तहसील प्रशासन सोयाबीन पिक कापणी प्रयोगात मग्न !!

माधव पवार / मारोती इबीतवार
राज्यातले दळभद्री सरकार यांना दुष्काळाच्या झळा काय कळणार राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात  होरपळत असताना सुद्धा सदरचे सरकार हे शेतकऱ्याचा नुसता पुळका करतो सदरचे सरकार हे सरसकट दुष्काळ जाहीर केला आहे 

सदरच्या दुष्काळा झळा शेतकऱ्यांना झोंबत असताना सुद्धा सदरचे सरकार हे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करीत नाही या उलट संबंधित तहसील प्रशासनाच्या मार्फत सदरच्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन पीक कापणीचा प्रयोग करत असल्याचे चित्र नायगावच्या तहसील प्रशासनातून दिसून येत आहे 

या राज्यातील दळभद्री सरकारने संबंधित तहसील प्रशासनाच्या मार्फत सोयाबीन पिक कापणीचा घेण्यात येत असलेला प्रयोग तात्काळ बंद करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लवकरात लवकर मदत मिळेल याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे 

Post a Comment

0 Comments