हिमायतनगर तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार हिमायतनगर महसूल प्रशासनाच्या वतीने हिमायतनगर मंडळातील शिबिरे दिनांक निहाय जवळगाव मंडळ दिनांक 15 9 2026 रोजी कुणबी प्रमाणपत्र नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी या शिबिरामध्ये एकूण दहा अर्ज प्राप्त झाले तर संबंध दिनांक 15 9 2026 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकही अर्ज आला नसल्याने या ठिकाणचा अहवाल महसूल प्रशासनाकडे निरंक असल्याची माहिती आहे दिनांक 16/09/2026 रोजी हिमायतनगर मंडळातील हुतात्मा जयंतराव पाटील माध्यमिक विद्यालयांमध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी बाबत शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकूण चार अर्ज प्राप्त झाले आहे त्यामध्ये पळसपुर येथील गोपाळ किशन, दत्ता भगवानराव, आणि आंनदेगाव येथील एक अशा एकूण मंडळामध्ये पैकी दोन मंडळामध्ये 14 अभिलेखाची या शिबिरामध्ये पडताळणी करून अर्ज प्राप्त करून घेण्यात आली असल्याचे मंडळ अधिकारी बीएम चव्हाण यांनी सांगितले आहे या शिबिरामध्ये उपस्थित हिमायतनगर महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार हयुन पठाण , मंडळ अधिकारी बी एम चव्हाण, हिमायतनगर सध्याचे तलाठी रामदासी, पळसपुर सज्याचे तलाठी डी. जी. सब्बनवार, तलाठी ताटेवाड , के. डी. गायकवाड, पळसपुर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिरारपल्लु, यु जे पठाण, कृषी सहाय्यक एस आर बेहेरे (ढगे) मॅडम, टेंभी येथील ग्राम महसूल अधिकारी संजय बिराडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यामध्ये लाभार्थी विनायकराव सूर्यवंशी राजू वानखेडे रमेश वानखेडे ज्ञानेश्वर सूर्यवंशी ज्ञानेश्वर वानखेडे कर नागोराव वानखेडे अवधूत वानखेडे यांनी आपल्या आजोबा काकांच्या नोंदी आणून या शिबिरामध्ये पडताळणी करून घेऊन महसूल प्रशासनाच्या वतीने त्यांना पुढील कुणबी नोंदीच्या कास्ट सर्टिफिकेट मिळण्यासाठी महसूल प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे अशी माहिती हिमायतनगर सध्याचे ग्राम महसूल अधिकारी रामदासी यांनी दिली आहे

0 Comments