नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांच्या वतीने नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे
सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी पोलीस खात्या मध्ये गेल्या ३५ वर्षा पासून विविध पोलीस ठाण्या मध्ये विशेष कामगिरी केली आहेजिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व दमदार पोलीस उपनिरीक्षक म्हणून कामगिरी बजावणारे व सध्याच्या परिस्थितीत म्हणजेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले विश्वंभर निकम या पोलीस अधिकारी सहकार्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात निरोप देण्यात आला आहे
सदरच्या कार्यक्रमात विशेष सत्कार करून त्याच्या भावी कार्यास शुभेच्छा पोलीस अधीक्षक डॉ रोहन यांनी दिल्या आहेत
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या राहेर बीट वर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांनी जसं सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत आपले पोलीस खात्यांचे काय कर्तव्य असते हे आज पर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात दाखवून दिले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वागतकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांचा विशेष सत्कार दिनांक ३० जुलै २०२६ केला होता
नांदेड उमरी कंधार मुखेड कुंटूर या पोलीस ठाण्यात चांगल्या प्रकारे आपली सेवा उत्कृष्टपणे बजावली आहे

0 Comments